पान:प्रमाणशास्त्र.pdf/123

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


११४
कर्णोपकर्णी पुरावा.

फौजदारी आरोप आला असल्यास, मरणार मनुष्याने शपथेचा आधारावांचून डोकीवर टेकलेल्या मरणाचा भीतीने त्या मरणाचा कारणासंबंधी सांगितलेले साङ्केतिक बोलणे, आरोपित मनुष्याचा परोक्ष सांगितले असले तथापिही पुराव्यात घेण्यांत येते. (सन १८६१ चा आक्ट २५ कलम ३७१.)

 २२६. खून किंवा मनुष्यवध साधारणतः गुप्तपणे केले जातात; आणि ते केल्याविषयींचा चांगला पुरावा मिळण्याचा साधारणतः अडचणीमुळे मुख्यत्वे. करून असा कर्णोपकर्णी पुरावा कबूल करण्यांत येतो; आणि शपथेचा संबंध असतां खरे बोलण्यास व लबाडी वर्जण्यास जितका बळकट हेतु मनुष्यास असतो, तितका, डोकीवर टेकलेल्या मरणाची आणि ईश्वराजवळ लवकरच झाडा द्यावा लागेल, अशी भीति असणान्या मनुष्यास असतो; म्हणून त्याणे दिलेली साक्ष ग्राह्य होत्ये.

 २२७. जो मनुष्य अंतकाळचे साङ्केतिक बोलणे बोलला असेल, तो इतक्या प्रौढ आणि अविक्षिप्त बुद्धीचा असला पाहिजे, की जर तो वांचला असता, तर न्यायाचा रीतीप्रमाणे त्याची साक्ष घेववती; आणि या कारणास्तवच, फार लहान मुलांची बोलणी, आणि जे लोक परलोक स्थितीची कल्पना न करण्याजोगे किंवा शपथेचा भार न समजण्याजोगे विक्षिप्त बुद्धीचे असतात, त्यांची साङ्केतिक बोलणी अग्राह्य आहेत.

 २२८. जो मनुष्य में साङ्केतिक बोलणे