पान:प्रमाणशास्त्र.pdf/122

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


अंतकाळची साङ्केतिक बोलणी.

११३

असा ठराव करून तो कज्जा परत चौकशीस पाठविला; कारण, त्या कज्जांतील वादी याणे प्रतिवादी याजला कांहीं कलाबतू विकली होती तिचा किमतीची शाबिती करण्यास्तव जज्जाने वादीचा वह्या तपासल्या नव्हत्या. बिजमोहन चौधरी विरुद्ध चंदरनमीषा, यांचा कजांत ही, कलकत्याचा सदर दिवाणी अदालतीने, वादीचा वह्या त्याचा तर्फ साक्षी प्रमाणे पुराव्यांत कबूल केल्या होत्या.

 २२४. या ग्रंथाचे कलम २२२ यांत लिहिल्याप्रमाणे इसवी सन १८५५ चा आक्ट २ कलम ४३ व ४४ यां अन्वयें मुकदम्यांतील पक्षकारांचा वह्या त्यांचा तर्फे प्रत्यंतरी पुराव्या प्रमाणे मात्र घेण्यांत येतात असे दिसेल; परंतु इसवी सन १८५७ चा आक्ट दुसरा चालू होण्यापूर्वी त्या स्वतंत्र पुराव्याप्रमाणे जर कबूल केल्या जात होत्या, (आणि त्या अशा कबूल करीत असत असे दिसते,) तर त्या कलमांवरून त्या कबूल करण्यास बहुतकरून व्यत्यय येणार नाहीं; कारण सदरहु आक्टाचा शेवटील कलमांत असे लिहिले आहे की," हा आक्ट ठरला नसता तर जो पुरावा कोण" त्याही कोर्टात घेण्यायोग्य असता, तो पुरावा त्या कोटीत घेण्यास अयोग्य होतो असे या आक्टाचा कोणत्याही ठरावावरून होते असे समजू नये. "अंतकाळची साङ्केतिक बोलणी.

 २२५. खुनाविषयी किंवा मनुष्यवधाविषयी