पान:प्रमाणशास्त्र.pdf/121

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


११२
कर्णोपकर्णी पुराबा.

वस्तु,दिल्या असतां,किंवा अमानत ठेविल्या असतां, किंवा पोचविल्या असतां,पावत्या देण्याची वहिवाट आहे त्या पावत्या.

 २२३.'इंग्लिश् कामनला यावरून एकाद्या पक्षकारास आपले येणे कर्ज आपल्याच वह्यांवरून शाबीत करण्याची परवानगी नाहीं; कारण कदाचित त्या दाव्यासाठी तो पुरावा बनाविला असेल, असें ही घडू शकेल. जा पक्षकाराने त्या रकमा लिहिल्या असतील त्याचा साक्षी प्रमाणे, व जी घडलेली गोष्ट लिहून ठेविली असेल ती घडण्याचा वेळी कामाचा नेहेमींचा अनुक्रमाने ती गोष्ट जितक्या नियमितपणाने लिहिली असेल त्या नियमितपणा प्रमाणे, आणि नानाविध इतर हकीकती प्रमाणे, या रकमा अधिकउण्या हरकतीस पात्र आहेत. परंतु रोमन सिव्हिलला प्रमाणे आणि फ्रान्स व स्काटलंड देशींचा ला प्रमाणे अशा रकमा पुराव्यांत घेतल्या जातात असे दिसते; आणि जा पक्षकाराचा वह्यांत त्या लिहिलेल्या असतात त्या पक्षकाराचा पक्ष शाबीत करण्याकरितांही त्या, जिल्ह्यांतील वहिवाटींत कबूल केल्या आहेत. याप्रमाणे, सन १८५१ चा नंबर १९ चा स्पेशल अपिलाचा फडशा तारीख ३ नोहेंम्बर सन १८५१ रोजी होऊन, मद्रास सदर अदालतीने, अशा कजांत व्यापा-याचा वह्या, खातरीलायक शाबीत झाल्यास, माल दिल्या बदल पैका घेण्याचा शाबिती करितां त्या वह्याच दस्तऐवजी पुरावा बस आहेत,

(७) देशाचार रूप कायदा. त०