पान:प्रमाणशास्त्र.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुयाचा तत्त्वाची शाबिती. अमुक खतावरून हक पोचतो, अशी शाबिती करूं नये. त्याचप्रमाणे आपल्या प्लीडिंगांत एका दस्तऐवजावर भरवसा ठेवून, नंतर, आपला वारसपणाचा हक्क शाबीत करता येत नाही. हा नियम फौजदारी आणि दिवाणी चौकशीस आणि दोन्ही पक्षकारांस सारखा लागू आहे. प्रतिवादीने प्रथम मारामार न केल्याची तकरार सांगून, पुढें, वादी याणे आपणास प्रथम ठोंसा मारिला, अशी शाबिती करून मारामार केली ती निर्दोष आहे, असे त्याचाने दाखववत नाही. ७. प्लीडिंगाशी पुरावा मिळता असावा, याची कारणे तीन आहेत:- प्रथम, प्रतिवादी याजवर जो दावा किंवा जी तोहोमत शाबीत करावयाची, त्याचे त्याजला यथार्थ स्वरूप समजले पाहिजे म्हणान; दुसरें, प्लीडिंगावरून कोडताला योग्य फैसल्ला देतां यावा म्हणून; आणि तिसरें, त्याच पक्षकारांचा दरम्यान तोच वाद पुनः पडल्यास तो फैसल्ला उपयोगी पडावा म्हणून. ८. अमुक गोष्टी अमुक गुन्हयांचा अवश्य भाग आहेत, असे फौजदारी कायद्याने ठरविले आहे, तेणेंकरून, त्या अवश्य गोष्टींपैकी एकादी न्यून असल्यास तो गुन्हा पुरता होत नाही. उदाहरण, पीनल कोडचा १९१ व्या कलमांत व्या. ख्यात जो "खोटो साक्ष देणे याचा गुन्हा हा, ती साक्ष देणारा " शपथ घेतल्यामुळे, अगर कायद्यांतील अमुक नियमामुळे खरा मजकूर सांगणे कायद्याने भाग असून,” किंवा, "कांही गोष्टींविषयी इकरार करणे