पान:प्रमाणशास्त्र.pdf/११

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


मुद्याचा तत्त्वाची शाविती.

 ५. कित्येक सार्वजनीन गोष्टींविषयी शाबिती घेतल्यावांचून कोडतें त्या गोष्टी न्यायाधिकारनात्याने लक्षात ठेवितील.जसे,-या मुलकांतील कायदे करणाऱ्या मंडळीने केलेले कायदे,व इंग्लंडांतील पार्लमेंटू सभेचे सार्वजनीन कायदे,व आपले कामगार व वकील, व गव्हर्नर जनरल, व गव्हर्नर, व सरकारचे दुसरे मोठे हुद्देदार, व सुप्रीम कोर्टाचे (जज्ज ) न्यायाधीश; यांजला कोडते न्यायाधिकारनात्याने लक्षात ठेवितात. काळाचे विभाग, व भूगोलसंबंधी स्थलांचे विभाग, व देशांचा मर्यादा, व त्यांचा राजां- ची नांवें, इल्काब, व निशाणे, हीही न्यायाधिकार- नात्याने लक्षात ठेवितात; आणि अशा कारणास्तव माहितीकरितां योग्य पुस्तकें किंवा दस्तऐवज कोडतां- स पाहण्याची मुखत्यारी आहे, ( स. १८५५ चा< आक्ट २, कलम २ तागाईत ६ पाह). या खेरीज आणखी काही सार्वजनीन गोष्टी इतक्या प्रख्यातीचा

आहेत, की त्यांची शाबिती कोडते मागत नाहीत.मुद्याचा तत्त्वाची शाबिती झाली पाहिजे.

 ६. प्लीडिंगें आणि पुरावा यांचामध्ये मेळ अस- ला पाहिजे; कोणी पक्षकाराने प्लीडिंगांमध्ये एका गो- ष्टीचा उपन्यास करून दुसरीची शाबिती करू नये. उदाहरण;- पक्षकाराने साधारण, म्हणजे वा- रशासारख्या, हक्काविषयीं दावा करून, मागाहून  (१) जाबजबाव, उत्तर व प्रत्युत्तर, या सर्वांस प्लीडिंगे अतें म्हणतात. तपासनीस.