Jump to content

पान:प्रमाणशास्त्र.pdf/१३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


मुद्यांचा तत्त्वाची शाबिती

कायद्याने भाग असून, जर न देईल तर पुरा होत नाही. आणि पीनकोडचा ३७८ व्या कलमांत चोरीचा गुन्हा सांगितला आहे, तो घडण्यास,कोणी एका मनुष्याचा सल्ल्यावांचून त्याचा कबजांतून अप्रामाणिक रीतीने घेऊन जाण्याचा इराद्याने जंगम मिळकत हालविली पाहिजे, ही गोष्ट अवश्य आहे;आणि अशा अवश्य गोष्टींपैकी एकाद्या गोष्टीची शाबिती झाली नाही तर,जा गुन्ह्यास ती शाबीत न झालेली

गोष्ट अवश्य आहे,त्या गुन्ह्याचा गुन्हेगार होअपराधी ठरूं शकत नाही.

 ९. पीनकोडांतील साधारण अपवादांपैकी एकाद्या अपवादांत आपल्या खटल्याचा समावेश होत आहे, असे दाखविण्याचा प्रयत्न आरोपित मनु- ज्याने केल्यावांचून, त्या खटल्याचा तसा समावेश होत नाही, अशी शाबिती करणे अवश्य नाही.परंतु त्या कोडाचे जे कलम चार्जीत उल्लेखित असेल, त्या

कलमांत जर विशेष अपवाद असेल,आणि जा गोष्टीने तो अपवाद घडावयाचा त्या गोष्टीची चार्जात नाकबूल असेल,तर त्या गोष्टीचा अभाव बहुतकरून हमेशा शाबीत केला पाहिजे.

 १०.त्याचप्रमाणे दिवाणी कायद्याचा ठरावअसा आहे,की अमुक गोष्टी अमुक हक्कांस अवश्य आहेत,अशी शाबिती झाली पाहिजे;आणि अशा गोष्टींची शाबिती झाल्यावांचून त्याहक्कांसंबंधी या कायद्याची मदद मिळत नाही.

 ११.आतां प्लीडिंगांचा आणि पुराव्याचा