पान:प्रमाणशास्त्र.pdf/119

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


११०
कर्णोपकर्णी पुरावा.

असतां बोललेलें तोंडचे साङ्केतिक बोलणे लेखी रकमे प्रमाणेच पुराव्यांत ग्राह्य आहे.

 २२०. साधारणतः नेहेमीचे काम चालत असतां लिहिलेल्या रकमांविषयींची वहिवाट सन १८५५ चा २ आक्टाचा ५० कलमाने वाढवून असे ठरविले आहे, की काम चालत असतां, जा वहींत कोणतीही पत्रे बार होऊन नंतर पाठविण्यांत येतात, ती वही हजर करून, आणि, नेहेमीचा वहिवाटी प्रमाणे आणि माझा माहिती प्रमाणे ते पत्र पाठविले गेले, अशी सुयुक्तिक कारणावरून खातरी पटून त्या खातरीचा बळावर जबानी देणान्या साक्षीचा साक्षीवरून त्या पत्राचा रवानगीची शाबिती होत्ये. अशा पुराव्यावरून, ते पत्र पाठविले गेले होते, असें अनुमान करण्याचा अधिकार आहे; आणि ते विवक्षित पत्र पाठविल्या बाबत त्या साक्षीदारांस स्वतांची माहिती नव्हती, अशी हरकत चालणार नाही असे दिसते.

 २२१. याच प्रमाणे कलम ५१ यांत असे लिहिले आहे की,"पत्रांची रवानगी व पोंच टिपण्यासाठी "वही ठेविली आहे अशा शाबीत झालेल्या वहीत, “ पत्रांचा रवानगीचे व पोंचेचे टिपण असेल, तर ते "टिपण काम चालत असतां केले आहे असे शाबीत "झाल्यावर, पत्र पोंचल्याविषयी ती वही प्रथमदर्शनी पुरावा आहे असे समजावें." कितीएक अंमलदार आपल्या अगदी शेजारचा लोकांची पत्रे पोचवित्या वेळी अशा प्रकारची वही पाठवून जांना ती पत्रे पोचतात त्यांची पावती त्या बुकावर लिहून