पान:प्रमाणशास्त्र.pdf/118

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



कार्यवशात् साङ्केतिक बोलणी.

१०९

मात्र ती पुराव्यांत ग्राह्य आहे. यास्तव,ज्या मुद्या बाहेरील घडलेल्या गोष्टी लिहिण्याचे त्याचे काम नसते,तशांची शाबिती करण्यास ती पुराव्यांत अग्राह्य आहे. उदाहरण, एका अम्मलदाराने आपल्या कामाचा नेहेमींचा क्रमांत एका मनुष्यास कैद केल्याबदल शेरा लिहून त्यांत त्या मनुष्यास जेथें कैद केलें ती जागा लिहिली होती; पुढे, त्या मनुष्यास कोणत्या जागी धरिलें या बाबतीची चौकशी करणे अवश्य पडले, तेव्हां ती जागा दाखविण्यासाठी तो शेरा कबूल करण्यांत आला नाहीं; कारण आपल्या शेन्यांत ती जागा लिहिण्याचे त्या अम्मलदाराचें काम नव्हते, असे ठरविण्यांत आले. आणि याच कारणास्तव जरी यहुदी लोक हे हमेशा आपल्या मुलाची सुंता त्यांचा शास्त्रांत सांगितल्या प्रमाणे आठव्या दिवशी करितात, हे प्रसिद्ध आहे, तथापि एका उपाध्यायाने तो विधि अमुक दिवशी केला म्हणून नोंद लिहून ठेविली होती ती त्या मुलाचा वयाची शाबिती करण्यास्तव पुराव्यांत घेण्यात आली नाही.

 २१९. शेवटी, या बाबदीत एवढे सांगणे आहे, की जा घडलेल्या गोष्टीविषयी ती रकम असेल, ती घडली त्या वेळी, किंवा त्या वेळेचा सुमारास ती लिदिलेली असली पाहिजे; कारण कांही काळ लोटल्यानंतर अशी रकम लिहिल्याने ती अगदी बेभरवशाची होईल. परंतु काम किवा धंदा साधारणतः चालत