पान:प्रमाणशास्त्र.pdf/117

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१०८
कर्णोपकर्णी पुरावा.

पुराव्यांत घेण्यांत येतील; आणि जा मनुष्याने ती रकम लिहिली असेल, किंवा जाचा माहितीवरून ती लिहिली असेल, तो जीवंत असला आणि साक्षीस आणतां येत असला तथापिही ती रकम पुराव्यांत घेतली जाईल.

 २१६. नेहेमीचे काम चालत असतां लिहिलेली रकम, जा मनुष्याने ती लिहिली असेल, किंवा तिजवर सही केली असेल, ती जा घडलेल्या गोष्टीविषयी असत्ये तिची त्या मनुष्यास स्वतः माहिती असल्यास मात्र पुराव्यांत घेण्यांत येत्ये. दुसऱ्या मनुष्याचा माहितीवरून त्या मनुष्यास माहिती मिळाली असल्यास ती उपयोगी नाही.परंतु वरील कलमांत सन १८५५ चा दुसन्या आक्टाचा ४० व्या कलमावरून सांगितलेल्या बाबतीत हा नियम ढील सोडिला आहे, असे दिसते; कारणत्यांत किंवा जा मनुज्याचा सांगितल्यावरून ती लिहिलेली असेल,असे शब्द लिहिले आहेत.

 २१७. ती रकम कामाचा किंवा धंद्याचा परिपाठाप्रमाणे लिहिलेली आहे, असे दाखविण्यासाठी काही पुरावा केला पाहिजे असे दिसते; कारण अशी रकम लिहिण्यांचे जा मनुष्याचे काम किंवा नेहेमीची वहिवाट असत्ये त्या मनुष्याने नेहेमीचे काम चालत असतां लिहिली असावी या गोष्टीचा आधाराने त्या रकमेची ग्राह्यता मुख्यत्वेकरून आहे.

 २१८. त्या रकमेपैकी जेवढा मजकूर लिहि. प्याचे नोंदणी करणाराचे काम असते, तेवढ्या पुर्ती