पान:प्रमाणशास्त्र.pdf/116

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


कार्यवशात् साङ्केतिक बोलणी.

१०७

"खालून जाण्यास पात्र असल्या मुळे एकादी चुकी लवकर उघडिकेस येऊन बाहेर पडण्याचा संभव "असतो, आणि त्याचप्रमाणे जा घडलेल्या गोष्टी"संबंधी त्या रकमा असतात त्या गोष्टी साधारणतः "थोड्याच मनुष्यांस माहीत असतात; म्हणून अशा "रकमा पुराव्यांत घेण्याकरितां पुराव्याचे नियम ढिले "सोडले असतां सत्याचा योग्य तपास लावण्यास "पुष्कळ ठिकाणी सोईवार होईल, आणि प्रसंगी, तसे "करणे जरूरही पडेल."

 २१५. नेहेमीचे काम चालत असतां लिहिलेल्या रकमा, जा मनुष्याने लिहिल्या असतील त्याचा मरणानंतर मात्र, पूर्वी साक्षीत घेण्यांत येत असत; परंतु स० इ० १८५५ चा आक्ट २ कलम ३९ वरून हल्ली त्याची बुद्धि भ्रष्ट झाली असल्यास, किंवा तो हकमती बाहेर असल्यास,किंवा सांपडत नसल्यास, या ग्रंथाचा २०७ कलमांत लिहिल्या प्रमाणे त्या प्रराव्यांत ग्राह्य आहेत; आणि त्याच आक्टचा ४० व्या कलमांत असे लिहिले आहे की, अशी एकादी रकम । जा व्यवहारासंबंधी असेल, आणि तो व्यवहार घडला असेल त्या वेळी किवा त्या वेळचा सुमारास ती लिहीली गेली असेल, तर पैका किंवा इतर मिळकत देयाकरितां ब्यांकनोटी, किंवा इतर दस्तऐवजना. वावरून, किंवा वर्णनावरून, किंवा व्यवहारावरून, किंवा इतर रीतीने ओळखण्याचा कामापुरता, त्याच रकमांतील ऐवज जाणे दिला असेल, किंवा घेतला असेल, तो मनुष्य ओळखण्याचा कार्यापुरता मात्र