पान:प्रमाणशास्त्र.pdf/115

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१०६
कर्णोपकर्णी पुरावा.


७. कामाचा ओघांत किंवा कामांत
झालेली साङ्केतिक बोलणी किंवा
बोललेला मजकूर.

 २१३. साधारणतः काम किंवा हुद्दा चालत असतां त्यांत जांस घडलेल्या गोष्टीविषयी माहिती असत्ये त्यांची साङ्केतिक बोलणी किंवा लेख, ही, जा घडलेल्या गोष्टीविषयी असतात ती गोष्ट घडली त्याच वेळी लिहिलेली असल्यास, त्यांचा मरणानंतर पुराव्यांत ग्राह्य आहेत.

 २१४. अशा रकमा साधारणतः कर्णोपकर्णी पुराव्याचा स्वरूपाचा असतात, हे उघड आहे; आणि त्या मुख्यत्वे करून खाली लिहिलेल्या कारणांस्तव पुराव्यांत घेण्यांत येतात; ती अशी की, “जेथें कप"टाचा हेतूविषयी संशयाचा अगदी अभाव असेल, "तेथे कामाचा साधारण नित्य परिपाठांत लिहिलेल्या "रकमा खन्या असतात, असे योग्य अनुमान उत्पन्न "होते; कारण नवीन मजकुराची योजना करण्यास "मेहेनत लागत्ये, म्हणून खोटें लिहून ठेविण्यापेक्षा "खरे लिहिणे सुलभ असते; आणि जा हकीकती परस्परें एकमेकांचा प्रत्यंतराचा असतात अशांचा सांखळीतील कड्यांप्रमाणे पूर्वोक्त रकमा असतात; तसेंच, खोटसाळ रकमांचा योगानें कारकुनाचा त्याचा यजमानापाशी बदलौकिक होण्याचा संभव असतो, तसेंच काम चालत असतां कामाचा ओघानें "लिहिलेल्या बहुतेक रकमा कितीएक लोकांचा नजरे