पान:प्रमाणशास्त्र.pdf/114

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



इतरांची साङ्केतिक बोलणी.

१०५

बाजू पुराव्यांत घेण्यात येत नाही असे दिसते; परंत जा मनुष्याने ती रकम लिहिलेली असेल, त्या मनष्याचा वतीने त्या हिशेबाची बाकी येणे निघत्ये, इतक्या गोष्टीवरून केवळ त्याचा हिताविरुद्ध ती रकम पुराव्यांत घेण्यास अयोग्य होणार नाही.

 २११. हिताविरुद्ध तोंडची साङ्केतिक बोलणी लेखी रकमांप्रमाणे म्हणजे नोंदण्यांप्रमाणे पुराव्यांत ग्राह्य आहेत, असे दिसते. परंतु लेखी रकमा अस. ल्यास जा मनष्याने त्या लिहिल्या असतील त्याणे त्या लिहिल्या किंवा त्यांवर सही केली, अशी शाबिती झाली पाहिजे; ती अक्षराची शाबिती केल्याने करतां येत्ये.

 २१२. प्रथमदर्शनी एकादी रकम हिताविरुद्ध आहे, असे दिसून ती खरोखर तशी नसत्ये, असे प्रकार कज्जांतून आढळण्यांत येतात. उदाहरण, एकाद्या मनुष्याजवळ एकादा जुना रोखा असून त्याची फिर्याद करण्याची मुदत सरली असेल, तर त्यांतील कांहीं रुपये आपणास पोचले, असा त्याचा पाठीवर शेरा लिहून तितक्या रकमेची स्वहिताविरुद्ध खोटसाकरीतीने जबाबदारी घेऊन आपला बाकीचा सगळा टावा पुनः मुदतीत आणू पाहील. आतां, अशा ठिकाणी असा पाठीवर लिहिलेला शेरा केवळ दर्शनी मात्र स्वहिताविरुद्ध आहे, परंतु खरोखर पाहतां उलट आहे. यावरून अशा कज्जामध्ये, मुदतीचा वेळ सरल्या पूर्वी तो पाठीवरील शेरा लिहिला, अशाविषयी प्रथम पुरावा करणे जरूर आहे, असे मानले आहे.