पान:प्रमाणशास्त्र.pdf/113

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१०४
कर्णोपकर्णी पुरावा.

"असेल तर, किंवा इनसाफाचा वेळी, किंवा सुनावणी "चा वेळी तो मनुष्य कोर्टाचा हुकमतीचा बाहेर वा"स्तविक व नेहेमी असेल तर, किंवा फार शोध केला "असतांही तो मनुष्य सांपडत नसेल तर," त्या प्रसंगी त्याचा पूर्वोक्त नोंदण्या व मजकूर पुराव्यांत ग्राह्य होतील.

 २०८. पूर्वी 'हित' हा शब्द लिहिण्यांत आला आहे, ते हित केवळ स्नेह, किंवा जिज्ञासा, किंवा बातमीची आवड, यांपासून उत्पन्न होणारे नसून, ते धनसंबंधी किंवा सत्ताप्रकारासंबंधी असले पाहिजे; आणि जा घडलेल्या गोष्टीविषयी एकादा मजकूर कि. वा रकम असेल त्या घडलेल्या गोष्टीचा खरेपणा जाणण्याची साधनें तो मजकूर सांगणारे किंवा रकम लिहिणारे यांस होती असे पाहिजे.

 २०९. हिताविरुद्ध जा नोंदण्या असतील त्या जा गोष्टीसंबंधी असतील ती घडली त्या वेळेस त्या लिहिलेल्या असाव्या, अर्शी आवश्यकता नाही; आणि त्या खासगी वहीत लिहून ठेविल्या असल्यास पुराव्यांत ग्राह्य आहेत. आणि केवळ पैका आल्या बदल किंवा दिल्या बदल मात्र गोष्टीची शाबिती करण्यास्तव त्या ग्राह्य होतात इतकेच नाही, परंतु पैका दिल्याची किंवा घेतल्याची रीति, आणि स्थळ, आणि वेळ, अशां सारख्या इतर हकीकती शाबीत करण्यास त्या पुराव्यांत घेण्यांत येतात.

 २१०. हिशेबाचा जा बाजूत हिताविरुद्ध रकम असत्ये ती बाजू मात्र साक्षीत घेण्यांत येत्ये, तबिरुद्ध