पान:प्रमाणशास्त्र.pdf/112

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


इतरांची साङ्केतिक बोलणी.

१०3

आहे; परंतु हिला काही अपवाद आहेत; आणि या वरून हिताविरुद्ध बोललेल्या मजकूराविषयी किंवा नोंदीविषयी स्टार्की याणे पुढील नियम लिहिला आहे, तो असा :- "एकाद्या मनुष्यास एकाद्या घड"लेल्या गोष्टीविषयी जर विशेष माहिती असेल, आ"णि त्या गोष्टीसंबंधी त्याणे केलेल्या नोंदीने किंवा " तिजबाबत फकत त्याचा साङ्केतिक बोलण्याने, " त्याणे असें न केले असते तर जा तिसऱ्या मनुष्या" वर त्याचा दावा चालला असता, अशा मनुष्यास • तो बोलणारा त्या दाव्यांतून मोकळा करीत असेल, " किंवा तो मनुष्य आपल्या नोंदीने वगैरे त्या दाव्या"ची आपणावर जबाबदारी घेत असेल, तर ती नोंद " त्या मनुष्याचा मरणानंतर त्या घडलेल्या गोष्टीवि.. "षयी ग्राह्य पुरावा आहे; हा पुराव्याविषयी एक " ठरलेला नियम आहे."

 २०६. याच प्रमाणे मोधी व वसूल करणारे व इतर अखत्यारी यांणी आपण पैका घेतल्या बदल स्वतांवर जबाबदारी आणण्या जोग्या नोदी लिहून ठेविल्या असतील, तर त्यांचा मरणानंतर त्यांत लिहिलेल्या घडलेल्या गोष्टींविषयी त्या चांगला पुरावा आहे, असे मोजण्यांत येईल.

 २०७. सन १८५७ चा आक्ट २ कलम ३९ यांत असे लिहिले आहे की, जा मनुष्याने स्वहिताविरुद्ध नोंदण्या केल्या असतील किंवा मजकूर सांगितला असेल, तो मनुष्य मैयत झाला नसला तथापि, “जर "तो बुद्धिभ्रष्ट झाल्यामुळे साक्ष देण्यास नालायक