पान:प्रमाणशास्त्र.pdf/111

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१०२
कर्णोपकर्णी पुरावा.

चालणार नाही. दुसरें, तो दस्तऐवज एकाया झाले. ल्या व्यवहाराचा भाग असला पाहिजे. झालेल्या गोष्टीचा केवळ हकीकतींचाच असल्यास उपयोगी नाही.

 २०३. अशा दस्तऐवजांचा खरेपणाविषयी इतर चालीप्रमाणे पुरावे घेतल्यावांचून ते दस्तऐवज मान्य करण्यांत येतात; हें जा नियमावरून कर्णोपकर्णी पुरावा वर्ज करण्यांत येतो, त्या नियमास अपवाद आहे; परंतु, जरुरीचा सबबेमुळे मात्र असा पुरावा मान्य होतो, असे वाचणाराने समजले पाहिजे

 ६. पक्षकारांशिवाय अन्यमनुष्यांनी आपल्या हिताविरुद्ध बोललेली साङ्केतिक बोलणी, किवा लिहिलेले मजकूर, यांविषयी कर्णोपकर्णी पुरावा.

 २०४. कबूलपणा आणि अंगीकार, या सदरा खाली चालू प्रकरणांतील पक्षकारांनी स्वहिताविरुद्ध बोललेल्या साङ्केतिक बोलण्याचा बाबतीविषयी पूर्वी विचार करण्यांत आला आहे; आतां दुसऱ्या मनुष्यां नी आपल्या स्वतांचा हिताविरुद्ध बोललेली साङ्केतिक बोलणी किंवा लिहिलेल्या नोंदी यांविषयी आपण विचार करूं.

 २०५. मनुष्ये आपल्या स्वतांचा धनसंबंधी किंवा सत्ताप्रकारासंबंधी हिताविरुद्ध खोटसाळपणाने एकादा मजकूर बोलणार नाहीत, किंवा एकादी नोंद करणार नाहीत, ही गोष्ट साधारणतः पाहण्यांत