पान:प्रमाणशास्त्र.pdf/110

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



५. प्राचीन भोगवटा.

१०१

 २०२. एकादा तीस वर्षांचा जुना दस्तऐवज असून, जा व्यवहाराविषयी तो असेल तो व्यवहार घडण्याचा वेळी तो लिहिला आहे, असा त्याचा अर्थ होत असल्यास, त्यावरून मिळालेल्या प्राचीन भोगवट्याचा शाबितीकरितां त्याजवरील साक्ष घेतल्यावांचून तो पुराव्यांत मान्य केला जातो; परंतु तो कागद योग्य ताब्यांतून आला पाहिजे, आणि प्राचीन भो. गवटा शाबीत करण्यास्तव त्या दस्तऐवजाचा अधिकारपरत्वे झालेली घराची डागडुजी किंवा भाड्याची पावती या सारख्या जांत मालको गर्भित आहे अशा कृत्यांचा शाबितीने त्या दस्तऐवजाला पाठपुरावा असला पाहिजे. तीस वर्षानंतर दस्तऐवजावरील सर्व साक्षीदार मैयत आहेत, असे कायद्याचे अनुमान आहे, ते विरुद्ध पक्षकारांनी वाढू शकवत नाही. परंतु जर दस्तऐवजांत खरडलेले असेल, किंवा त्यामध्ये नवीं अक्षरें घातली असतील, किंवा त्याजविषयी संशय घेण्यास काही इतर कारणे असतील, तर त्यावरील साक्षीदार जीवंत असतील त्यांपैकी एकाद्याकड़न त्या दस्तऐवजाची शाबिती करून घेणे, किंवा अक्षराचा साक्षीने शाबिती करून घेणे, हें दूरदृष्टीचे काम आहे. जा ठिकाणी तो दस्तऐवज सांपडावयासारखा होता, त्या ठिकाणाहून तो दस्तऐवज हजर केला असल्यास पुरे आहे; आणि, तो दस्तऐवज ठेवण्यास एकादें अधिक योग्य ठिकाण होते, अशी हरकत