पान:प्रमाणशास्त्र.pdf/109

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१००
कर्णोपकर्णी पुरावा.

स्यांविषयी मैयत मनुष्यांची दृढकथने पुराव्यांत ग्राह्य आहेत असे दिसते.

 २००. परंपरागत कुलोत्पत्ति, किंवा एक रक्तसं. बंध किंवा आप्तपणा, या बाबतीत मात्र कर्णोपकर्णी पुरावा घेतां येतो; आणि त्याबाहेरचा मुद्याचा बाबतीची शाबिती करण्यास्तव असा पुरावा घेतां येत नाहीं; जसे, जन्मभूमीचा पुरावा अशा साक्षीने होत नाही. परंतु जर एकाद्या मनुष्याचे नाव एकाद्या जाय्यावरून पडले असेल, तर अशा सारख्या दुसऱ्या ठिकाणी एकाद्या मुद्यावरून काही संबंधाची ओळख पटण्याचा उपयोग घडतो तेथें जशी स्वतः वंशावळी. चाच बाबतीची शाबिती करण्यांत येत्ये, त्याच प्रमाणे तशा मुद्याचीही शाबिती करणे हे योग्य आहे, असे मानले आहे.

 २०१. शेवटी, असें ध्यानांत ठेविले पाहिजे की, अरी सदरी लिहिलेल्या यत्ता राखून वंशावळीचा बाबतीत कांपकी पुरावा घेण्यांत येतो, तरी अशा बाबतींतही तो पुष्कळ ठिकाणी फार थोड्या मान्यतेस योग्य असतो. इतर प्रकारचा कर्णोपकर्णी पुराव्यास जा हरकती असतात, त्याच बहुतकरून सर्व हरकतींस हा पुरावा साधारणतः पात्र असतो; परंतु वंशावळीचा बाबतीची शाबिती इतर रीतीने करण्याचा अडचणीमुळे असा कर्णोपकर्णी पुरावा मुख्यत्वे करून घेण्यांत येतो.