पान:प्रमाणशास्त्र.pdf/107

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


९८
कर्णोपकर्णी पुरावा

तसेच, मैयत मनुष्याने केलेले दृढकथन, त्या बाबतीविषयी वाद पडल्यापूर्वी झालेले असले पाहिजे, नाहीं तर ते अग्राह्य होते.

४. वंशावळी वगैरे.

 १९६. वंशावळीचा बाबतीत, कुलोत्पत्तीविषयी किंवा एकरक्तसंबंधाविषयी किंवा लग्नाचा योगें करून झालेल्या संबंधाविषयी प्रश्न येतात. अशा घडलेल्या गोष्टींची शाबिती, स्वतांचा माहितीवरून बोलूं शकतील अशा लोकांचा प्रत्यक्ष साक्षीने करणे कठीण आहे, म्हणून अशा ठिकाणी कर्णोपकर्णी पुरावा ग्राह्य होतो; आणि या गोष्टी बहुधा इतक्या पुतेपणी सार्वजनीन असतात, की त्या अशा पुराव्याने निर्भयतेने शाबीत करता येतात.

 १९७. अशा चौकशीत आईबा नवऱ्याबायको प्रमाणे एकत्रपणे राहत होती आणि ती एकमेकांस तशी मानीत होती, आणि आपल्या मुलांस ती औरस म्हणत होती, याविषयी शाबिती करण्यास मैयत मनुज्याचा दृढकथनाविषयी कर्णोपकर्णी पुरावा घेण्यांत येतो आणि अशा प्रकारची तोंडची कर्णोपकर्णी साक्ष घेण्यांत येत्ये इतकेच नाही, तर जो लेखी पुरावा इतर प्रकरणी कर्णोपकर्णी म्हणून नाकबूल करण्यांत येतो, तोही वंशावळीचा बाबतीत घेण्यांत येतोः उदाहरण. "एकाद्या कुटुंबांतील मैयत पुरुषांनी वह्यांत लिहून ठे. "विलेल्या नोंदण्या,भाऊबंदांचा दरम्यानचे कागदपत्र,