पान:प्रमाणशास्त्र.pdf/106

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



साधारण हिताची प्रकरणे.

९७

बाबतीत, तसेच साधारण लोकवार्तेचा चौकशीचा प्रत्येक प्रकरणांत, त्या चौकशीचा स्वरूपावरूनच घडलेल्या विशेष गोष्टीविषयी सर्व पुरावा अग्राह्य होतो. कारण वादग्रस्त गोष्टीविषयी जगाचा अभिप्राय काय आहे हे पाहणे असते; तो कोणत्या घडलेल्या गोष्टी. चा आधाराने झाला आहे हे पाहणे नसते. म्हणून, अशा ठिकाणी सर्व लोकांचा साधारण भरवसा किंवा अभिप्राय काय आहे, याविषयी मात्र पुरावा घेतला पाहिजे.

 १९५. मैयत मनुष्यांनी सांगितलेल्या मजकूराविषयी कर्णोपकर्णी पुराव्याने शाबिती करणे, ही साधारण हिताचा बाबतीची शाबिती करण्याची दुसरी रीति आहे; आणि या प्रकारचा शाबितीतही तो मजकूर साधारण लौकिकाविषयी असला पाहिजे, विशेष घडलेल्या गोष्टीविषयी किंवा तो हक्क चाल. विण्याचा विवक्षित उदाहरणाविषयी नसावा. सा. धारण हिताविषयींचा बाबतीत, त्या बाबतीचा खरे. पणा जाणण्याची जा मनुष्यांजवळ योग्य साधनें असतील त्या मनुष्यांपासून तो पुरावा आला आहे, असे दाखविणे जरूर आहे, असा पूर्वी समज होता; परंतु साम्प्रत ती दिकत त्या मनुष्याचा विश्वसनीयतेस मात्र लागू आहे, ती त्याचा ग्राह्यतेस लागू नाही, असे दिसते. परंतु तंट्यांतील हक्काचा खरोखर उपभोगा. विषयींचा शाबितीने त्या पुराव्याचे पुष्टीकरण झाल्या. वांचून, तो विशेष मातबरीचा नाही. हाच प्रकार लो. कवातेविषयींचा पुराव्यास त्याच प्रमाणे लागू पडतो.