पान:प्रमाणशास्त्र.pdf/105

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



९६
कर्णोपकर्णी पुरावा.

लिहिले आहे. “याठिकाणी, 'हित ' या शब्दाचा "अर्थ, जिज्ञासा संतुष्ट करणारे म्हणून हितकारक, "किंवा शोधकपणा अथवा मौज यांची आवड पुर" विणारे म्हणून हितकारक, असा नव्हे; तर, जांत " लोकांचा एका विवक्षित वर्गाचें धनसंबंधी हित "असते, तें, किंवा जा एकाद्या हितावरून त्यांचा कायदेशीर हक्कास किंवा जबाबदारीस नफानुकसान “पोचते, ते, असा 'हित ' या शब्दाचा अर्थ होतो.” अशा प्रकरणासंबंधी में मैयत मनुष्ये बोलली अस. तील, त्या विषयींचा कर्णोपकर्णी पुराव्याने ती प्रकरणे शाबीत करता येतील; किंवा त्या प्रकरणांविषयी साधारण लोकवार्तेचा पुराव्याने ती शाबीत होतील, ही एक कर्णोपकर्णी पुराव्याची दुसरी जाति आहे.

 १९३. एकाद्या घडलेल्या सार्वजनीन गोष्टीविषयी सर्व जगताचा जो साधारण भरवसा किंवा अभिप्राय असतो, त्यास ‘साधारण लोकवार्ता' किंवा 'जनवार्ता' असे म्हणतात. आणि जा लोकांचा असा साधारण भरवसा असतो त्या लोकांतील असामींचा साक्षीचा द्वाराने या साधारण भरवशाविषयी पुरावा मिळतो. खासगत बाबतीविषयी सार्वजनीन अभिप्राय बहुधा दोषयुक्त असतो, परंतु सार्वजनान प्रकारचा घडलेल्या गोष्टीविषयी साधारणतः लोक इतक मोकळ्या मनाने बोलतात, की त्या एकंदर लोकांपैकी जांचे त्यांत हित असते ते त्यांविषयीं खरा अभिप्राय काढतील, असे अनुमान करण्यास आधार असतो.

 १९४. जसे साधारण आब्रविषयींचा साक्षीचा