पान:प्रमाणशास्त्र.pdf/104

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



साधारण हिताची प्रकरणे.

९५

चौकशीपर्यंत राखून ठेवणे उत्तम आहे, असा समयीं विचार करील. आणि दुसरें, जा हेतूंनी अंगीकाराचा खोय मजकूर सांगण्यास मनुष्य प्रवृत्त झाले आहेत, त्यांपैकी पुष्कळ हेतु आरोप आला असतां मौन धरू. न, आपण अपराधी आहों, असे खोटेंच दाखविण्यास त्यांस प्रवृत्त करतील. यास्तव असा पुरावा वचितच विशेष उपयोगी पडतो.

३. साधारणहिताचा प्रकरणांविषयी
कर्णोपकर्णी पुरावा.

 १९२. सर्व मनुष्यांचा संबंधाची जी प्रकरणे असतात, त्यांस, सार्वजनीन हिताची प्रकरणे, असे म्हणतात; आणि जी पुष्कळ लोकांसंबंधी असून सवाचा संबंधाची नसतात, त्यांस, साधारण हिताविषयी प्रकरणे,असे म्हणतात.गांवांचा दरम्यानचा हद्दी; एकाद्या गांवचा किंवा शहरचा हद्दी;राहदारीवरीलदस्तुरी घेण्याचा हक्क, दुसऱ्यास "व्यापारांत न येऊ देतां व्यापार करण्याचा हक्क, पडीत जमिनीवरील वनचराईचा हक्क; रस्ते दुरुस्ती करण्याची किंवा झाडे लावण्याची जबाबदारी; " नळ,तळी, किंवा धुण्याचे घाट यांजवरील हक्क; "गायरानाचे हक्क." इत्यादि ही सर्व सार्वजनीन आणि साधारण हिताविषयी उदाहरणे आहेत. ही जिल्ह्यांत बहुतकरून आढळतात असें नार्टन याणे