पान:प्रमाणशास्त्र.pdf/103

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



९४
कर्णोपकर्णी पुरावा.

आतां, हिंदुस्थानांत तोडचा अंगीकाराचा मजकुरावि. षयी साधारण साक्षीदाराचा साक्षीस बहुधा फार थोडें वजन असते; कारण कैदीने बोललेल्या शब्दांविषयी जी त्यांची साक्ष तींतील मजकूर, जर हुबेहुब मिळत असेल, तर तो मेळ बहुतकरून खचित शिकवणीचे फळ होय, आणि जर त्यांचा मजकुरांत विशेष तफावत असेल, तर तेणेकरून त्या कबूलपणाची शाबिती होत नाही. एकाद्या दिवाणी मुकदम्यांत केलेल्या क. बूलपणास वरील विचार लागू पडतात.

 १९१, कैदीवर आरोप ठेवण्यांत आला त्या वेळी तो मुका राहिला, किंवा त्याणे चुकवाचुकवीची उत्तरे दिली, हे दाखविण्यास्तव केव्हां केव्हां पुरावा देतात. अशा हकीकतीस जे वजन द्यावयाचे, तें जा रीतीने तो आरोप ठेवण्यांत आला असेल त्या रीतीस फार अनुसरून असते; म्हणजे जसें, तो आरोप विनोदाने किंवा खरोखर केला आहे असें तो आरोपित मनुष्य समजला होता की काय, किंवा गुन्हा उघडकीस आल्यानंतर लौकरच तो आरोप अंमलदार मनुष्याने आणिला होता की काय; सारांश, त्या बाबतीविषयी सर्व हकीकतीवरून तो आरोप माघारविणे जरूर आहे असें आरोपितास स्वाभाविकच वाटेल की काय, हे पाहिले पाहिजे. अंमलदार मनुष्याने कोणी एकाद्या मनुष्यावर कायदेशीरपणाने आरोप ठेविला असल्यास, आणि तो मनुष्य मागेपुढे पाहणारा असल्यास, तो निरपराधी असूनही आदिच काही तरी उतावळीने बोलण्यापेक्षा आपली तक्रार