पान:प्रमाणशास्त्र.pdf/102

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


अंगीकार

९३

एकाद्या मनुष्यास प्रवृत्त करण्यास असंख्य कारणे आहेत, हे दाखविण्यास सदरील व्याख्यान बस होईल; आणि हिंदुस्थानांतील लोकांचा मनोवृत्ति युरोपियन लोकांस किती अपुर्तपणी समजण्यांत येतात याविषयीं, आणि आरोपित मनुष्यावर किती अयोग्य आबदाब चालविण्याचा संभव आहे याविषयी, जर आपण विचार केला, तर या देशांतील कैदींचा कबुलाती म्हणजे अंगीकार हे फार सावधगिरीने घेतले पाहिजेत, असा सिद्धान्त करणे अवश्य आहे. मिस्तर मेन याणे फौजदारी कायद्याविषयी आपल्या अमल्य ग्रंथांत मि० मोरहेड् याचा असा अभिप्राय लिहिला आहे की, "ताब्यांतील फौजदारी न्यायाधी"शांनी जा कैदींची चौकशी होत असेल त्यांस, जें "तुम्ही मज पुढे सांगाल त्याचा तुमचा विरुद्ध पुरा"व्यांत उपयोग केला जाईल, अशी हमेशा समजूत "द्यावी.” आणि जरी या वहिवाटीची साधारणतः गरज नसली, तरी पुष्कळ अति अज्ञान कैदींशी गांठ पडल्यास उपयुक्त होईल असा संभव आहे.

 १९०. कोडता बाहेर तोंडी सांगितलेल्या अंगीकाराचा मजकुराविषयी कर्णोपकर्णी पुरावा घेत्ये वेकी. ती साक्षी देणान्या साक्षीदारांनी केलेल्या मिथ्यावर्णनाविषयी आपणास जपून असले पाहिजे, मग ते मिथ्यावर्णन बुद्धिपूर्वक असो किंवा नसो. ते साक्षीदार मामाणिक असले पाहिजेत इतकेच नाही; परंतु जे शब्द बोलण्यांत आले असतील, ते ऐकून घेण्यांत आणि सांगण्यांत, सावध आणि समजदार असले पाहिजेत.