पान:प्रमाणशास्त्र.pdf/101

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



९२
कर्णोपकर्णी पुरावा.

परदेशी चाकरीवर असतां, आपणास चौकशीसाठी तरी स्वदेशी पाठवितील, अशा हेतूनें, आपण इंग्लंडांत असतां अमुक अपराध केला, असा अंगीकाराचा खोटा मजकूर त्यांणी सांगितला आहे.

 १८७. जे आपणास प्रियकर होते त्यांजवरील संशय टाळविण्यास्तव कित्येकांनी अंगीकाराविषयी. चा खोटसाळ मजकूर सांगितला आहे, आणि त्यावरून त्यांचे प्राणही गेले आहेत. मरायास् क्यानिग् आणि एमा हलिग यांचा कज्जाचे उदाहरण बेस्ट याणे दिले आहे. या दोघींनी, आपल्या पोरक्या पोरांस इतर रीतीने पोसण्याची शक्ति नसल्यामुळे त्यांचा मागे त्या मुलांस सरकारांतून पोटास मिळावे, या हेतूनें खोटेच अपराध अंगीकारले; पुढे ते त्यांवर स्था. पित होऊन त्यां पैकी एकीस देहान्त दंड झाला; ते पा. हून दुसरीने संतापाने आणि शोकानें प्राण सोडला.

 १८८. आपल्या शत्रूस आरोपांत गोवून घे. ण्यास्तव कितीएकांनी खोटसाळ रीतीने अंगीकाराचा मजकूर सांगितला आहे, असें ऐकण्यांत आहे. आणि या मुलकांत जसे धनवान कैदींस आपल्यावरील कैदेची शिक्षा भोगण्यास बदली सांपडले आहेत, त्या प्रमाणे एकाद्या वजनदार मनुष्याने एकादा अपराध केला असेल त्यास पैक्या करितां खोटसाळ रीतीने अंगीकाराचा मजकूर सांगण्या सारखा एकादा दरिद्री मनुष्य कदाचित् मिळू शकेल.

 १८९. जा एकाद्या गुन्ह्याचे आपण निरपराधी आहों त्याविषयी अंगीकाराचा मजकूर सांगण्यास