पान:प्रमाणशास्त्र.pdf/८७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


७८
कर्णोपकर्णी पुरावा.

न्यायाधीशाने अयोग्य रीतीने दाब घालून त्यापासून करून घेतलेला कबूलपणा निरर्थक मानला गेला आहे.

 १६५. कोणताही कबलपणा पुराव्यांत घ्यावयाचा असेल, तर तो अयोग्य आबदाबापासून अगदी मोकळा असला पाहिजे; हे इतकें अवश्य मानले आहे की, फिर्यादीपर्यंत मजल न यावी म्हणून खासगी रीतीनें कज्जाची तोडजोड किंवा समजूत होण्याविषयी बोलणे चालत असतां केलेला कबूलपणा, भरवशाचा बोलण्या सारखा समजून,पुराव्यांत घेतला जात नाही;याचे कारण असे दिसते की,एकादा पक्षकार इतर प्रसंगी जा गोष्टी नाकबूल करतो, त्या कज्जाकफावतींशिवाय स्वस्थतेने उलगडा करण्याकरिता कदाचित् कबूल करील.अशा बाबतींत जा एकाद्या लेखी मजकुरांत कबूलपणा असतो त्या लेखाचा आपणाविरुद्ध उपयोग होऊ नये, अशी तो मजकूर लिहिणाराची इच्छा असल्यास, त्या लेखाचा आरंभी'नुकसानावांचून' असे शब्द लिहितो, तेणेकरून तो लेख त्याचा हिताविरुद्ध किंवा त्याचा तर्फेचा पुराव्यांत दाखल करतां येत नाही.


 अंगीकार.

 १६६. फौजदारी गुन्ह्यांतील आरोपित मनुष्याने केलेले अंगीकार, हे दिवाणी कजांत पक्षकारांनी केलेल्या कबूलपणा सारखे आहेत. या दोन्ही गोष्टीं-