पान:प्रमाणशास्त्र.pdf/८६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


पक्षकाराचा स्वहिताविरुद्ध कबूलपणा.

७७

पडण्याकरितां त्या अखत्यान्याचा अखत्याराचा मर्यादेंत असला पाहिजे.भागीदारी किंवा अखत्यार,हौं प्रथम शाबीत झाल्यावांचून भागीदाराचा किंवा अखत्यान्याचा कबूलपणा पुराव्यांत घेतला जाणार नाही. अशी शाबिती होण्याकरितां जा मनुष्याने तो कबूलपणा केला असेल त्याणे ती भागीदारी किंवा अखत्यार कबूल केला असेल तर तेवढ्या वरूनच पुरावा होत नाही.लेखी पावती लिहून देणारावर आणि जा मनुष्याचा

हिताकरितां ती लिहून दिली असेल त्या मनुष्यावरही, तिचा परिणाम काय होतो न्याविषयी पुढे सांगितले जाईल. पाळण करणान्या मनुष्याने केलेला कबूलपणा शपथेवर केला असला तरीही, जर तो त्या विवक्षित चौकशीसाठी केला नसेल, तर इंग्रेजी शास्त्रावरून त्याचा दिमतीतील पाल्य मनुष्याविरुद्ध पुराव्यांत कबूल होत नाही. “ एकाद्या स्त्रीस जेव्हां" तिचा नवन्याचा अखत्यार असेल, तेव्हा मात्र तिचा कबूलपणा तिचा नवऱ्यावर लागू पडेल.

 १६४. जा पक्षकाराने कबूलपणा केला, तो त्याणे आपल्या हिताविरुद्ध केला असल्यास मात्र पुराव्यांत घेतला जाईल, नाही तर तो घेतला जाणार नाहीं; आणि बलात्कारानें, किंवा कपटानें, किंवा मिथ्या वर्णनाने करून घेतलेला, किंवा घडलेल्या गोटीविषयी चुकीने झालेला कबूलपणा, त्याच प्रमाणे अग्राह्य आहे; आणि या प्रमाणे कनिष्ठ कोडतांत एक पक्षकार स्वतः हजर झाला असून त्याजला