पान:प्रमाणशास्त्र.pdf/८५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


७६
कर्णोपकर्णी पुरावा

. हजर करता येतो, त्या लेखांतील मजकूराविषयी नोंडचा कबूलपणाचा पुरावा, हा, सदरहु लेख हजर करून केलेल्या पुराव्यापेक्षा कमी खातरीचा आहे असे कबल केले पाहिजे.

 १६२.एका प्रतिवादीने दिलेला जाब “दुसऱ्याच्या विरुद्ध साक्ष"होत नाही.मद्रास सादर अदालतीने तारीख १० एमिलू सन १८६१ रोजी सन १८६० चा स्पेशल अपील नंबर ५५० चा फैसलकेला. तो कज्जा जमिनीचा एक तुकडा परत घेण्याविषयीं होता; त्यांतील १ नंबरचा प्रतिवादीने दावा कबूल केला; परंतु माझा भाऊ, म्हणजे दुसरा प्रतिवादी, याचे व माझें पूर्वीच वाटप झाले असून ती मिळकत त्याचा कबजांत आहे, अशी तकरार केली; यावरून पहिल्या वादीचा कबूलपणा दुसन्याचा विरुद्धउपयोगी पडू शकला नाही. कारण, पहिल्या प्रतिवादीचा स्वतांचा सांगण्यावरून या दोन प्रतिवादींचा दरम्यानचा हिताविषयी एकदिलपणा नसून दुसऱ्या मतिवादीचा हातांत कबजा होता, असे दिसून आले.

 १६३. सामईक व्यवहारासंबंधी एका भागीदाराने हिताविरुद्ध केलेला कबूलपणा किंवा दिलेला जाब, विरुद्ध पक्षकाराशी संगनमताने केला आहे असे दाखविले नसल्यास, दुसऱ्या भागीदारांविरुद्ध तो कबूलपणा साक्ष समजला जाईल. परंतु तो कबूलपणा भागीदारांवर लागू पडण्याकरितां सामईक व्यवहारासंबंधी असला पाहिजे आणि याच प्रमाणे एखाद्या अखत्याऱ्याचा कबूलपणा त्याचा मालकावर लागू