पान:प्रमाणशास्त्र.pdf/८४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


पक्षकाराचा स्वहिताविरुद्ध कबूलपणा.

७५

व वास्तव अर्थ, ही समजावी म्हणून, जा शब्दांनी तो कबूलपणा केला असेल ते जितके नजीक यथातथ्य बोलूं शकवतील तितके बोलावे, आणि तो कबूलपणा जा रीतीने व जा हकीकतींनी केला त्यांचें प्रदर्शन करावें. मद्रास इलाक्यांतील जिल्ह्यांत कर्जाविषयी फिर्यादीचा पुरावा बहुत करून हमेशा प्रतिवादीचातोंडचा कबूलपणाविषयी साक्षीने करतात, परंतु मतिमश्न केले असतां ते साक्षी बहुधा गडबडतात.

 १६०. जा पक्षकाराचा विरुद्ध एकादा कबूलपणा पुराव्यांत दिला असतो, त्या पक्षकारास, तो सर्व लेख किंवा त्या विषयाशी किमानपक्ष जितका लागू असेल तितका तरी वाचला जावा किंवा तो कबूलपणा तोंडचा असल्यास त्या विषयासंबंधी अशेष संभाषण पुनः वदवून घ्यावे, अशी अट धरण्याचा हक्क आहे.

 १६१. साक्षीविषयींचा इंग्रेजी शास्त्रांत कबूलपणाचे इतकें वजन मानले आहे की, एकादा लेख हजर करतां येत असतां हजर केला नसेल तथापि त्यांतील मजकूराविषयी एकाद्या पक्षकाराने केलेल्या कबूलपणाचा बाबतीत साक्ष घेण्यांत येत्ये.सदरील नियमा प्रमाणे असा पुरावा ग्राह्य आहे,परंतु, त्याची मातबरी किती, हा निराळाच प्रश्न आहे; तसेच एकाद्या संभाषणाचा हकीकती सांगण्यांत बहुतकरून लोक अतिशय चुक्या करितात, त्याविषयी आणि या देशांत सत्याची कमी मान्यता आहे याविषयी विचार केला असतां, जो लेख पुराव्यांत