पान:प्रमाणशास्त्र.pdf/८३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


७४
कर्णोपकर्णी पुरावा.

केलेला पूर्वोक्त कबूलपणा किती उपयोगी पडेल, या गोष्टीचा निर्णय झाल्याचे ग्रंथकारास आढळत नाही; परंतु जेव्हां हिंदुस्थानांतील इनसाफाची वहिवाट अधिक ऊर्जित दशेस येईल, तेव्हां इंग्लंडांतील वहि-

वाटीविषयी सदरील सूचना ही कदाचित् उपयोगी पडेल.

 १५८.कनांतील जाबजबाबाशिवाय मजकूराने केलेला कबूलपणा खेरीज करून इतर रीतीने केलेल्या कबूलपणाची शाबिती कर्णोपकर्णी पुराव्याने करता येईल. साधारण कर्णोपकर्णी पुराव्यापासून हा प्रकार खरोखर फार भिन्न आहे.कारण कोणी मनुष्य एकादी गोष्ट खरी असल्यावांचून ती आपल्या हिताविरुद्ध खुशीने कबूल करणार नाही, याविषयींचे अनुमान इतके बळकट आहे की,साधारण साक्ष खरी पटण्यास कायद्याप्रमाणे दिलेली शपथ आणि प्रतिप्रश्न करण्याचा प्रकार ही दोन मुख्य साधनें असतात, त्यांपेक्षाही स्वहित हे विशेष सबळ साधन आहे. आणि मुकदम्यांतील एकाद्या पक्षकाराने आपल्या हिताविरुद्ध केलेल्या कबूलपणाविषयींची साक्ष,ही कर्णोपकर्णी पुराव्याचा रूपाची आहे असे मानण्यापेक्षा, मूळ रूपाची आहे असे मानिले असता चालेल.

 १५९, अशा तोंडचा कबूलपणाविषयींचा पुराव्याचे वजन, साक्षीदाराचा प्रामाणिकपणाविषयींची पत आणि त्याचा स्मरणाची बळकटी यांचा अनुरोधाने विशेषेकरून असते. कबूलपणाची पूर्ण मजबुढ़ी