पान:प्रमाणशास्त्र.pdf/८२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


पक्षकाराचा स्वहिताविरुद्ध कबूलपणा.

७३

आडवेपणा घेऊन कज्जाचा जाबजबाबांतील मजकूरावरून झालेला गर्भित कबूलपणा, त्या कबूलपणाकरणाऱ्या पक्षकाराचाविरुद्ध त्या आडवे येण्याविषयी निर्णय झाल्यावांचून त्याचा हिताविरुद्ध होणार नाही, असे दिसते. या बाबतींत, राबिन्स् विरुद्ध लार्ड मेड्स्टन, हा कज्जा निर्णित झाला आहे; त्यांतील दावा मामिसरी चिठीवरून होता. त्यांत चिठीचा रकमेपेक्षा कमती ऐवज पोचला असून त्याची मी फेड केली आहे, अशी प्रतिवादीची तकरार होती. वादीने चिठीपेक्षा ऐवज कमी पोचल्याबाबदचा कथनाविषयींचा तकरारीकडे लक्ष न देतां फेडीचा दृढकथनाविषयी आडवेपणा घेऊन उत्तर दिले. या कनांत वादीतरफेनें निवाडा होऊन चिठीची सर्व रकम देण्याचा ठराव झाला; याचे कारण असे दिसते की, फेडीची शाबिती, वादीकडून झाली नाही, त्यावरून त्याची मानितकरार रद्द झाली; आणि यास्तव त्याजला वादीचा गर्भित कबूलपणापासून फायदा मिळू शकला नाही. आणि वास्तविक पाहतां, कांहीं मजकूर गाळून केलेला कबूलपणा कांही शर्तीने केलेला असतो असें वास्तविक रीतीने मानले पाहिजे. ती शर्त अशी की,आड आलेल्या दृढ कथनाची जर सामनेवाल्याने शाबिती केली तर तो कबूलपणा अमलांत येतो.

 १५७.सन १८५९ चा आक्ट ८,या अन्वये हिदुस्थानांत फार निराळी वहिवाट सुरू झाली आहे, तिजवरून इंग्लिश् वहिवाटी प्रमाणे नियमित जाबजबाबांत