पान:प्रमाणशास्त्र.pdf/८१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


७२
कर्णोपकर्णी पुरावा,

मालकीचा हक्क नाकबूल करण्यास भाडोत्री याजला प्रतिबंध आहे.

 १५५.कोणत्याही कज्जांतील जाबजबाबांत केलेला कबूलपणा त्या कज्जांत मात्र प्रतिबंधक होतो,आणि तो दुसऱ्या कोणत्या फिर्यादीत लागू पडणार नाही,असा साधारण नियम आहे.परंतु पहिल्याफिर्यादीत झालेल्या निवाड्यावरून नंतर फिर्याद केली असल्यास,तीत पहिल्या फियोंदीतील जाबजबाबावरून झालेला कबूलपणा दुसऱ्या फिर्यादीत उपयोगी पडेल. कजांतील कागदांचा मजकूरावरून झालेल्या कबूलपणापासून जा कज्जांत तो झाला असेल त्याच कनांत परिणाम काय होतो याविषयीं टेलरकृत पुराव्याचा ग्रंथांत असा नियम लिहिला आहे की,"कजांतील जाबजबाबांत कांहीं मुद्याचे दृढकथन सुयुक्त केले असून विरुद्ध पक्षकार त्याचा निन्हव न करितां ते सोडून देईल, म्हणजे आपल्या जाबजबाबांत कबूलातीचा आणि टाळाटाळीचा जबाब देईल,किंवा दुसन्याच कोणत्या मजकूरास आडवा येईल,"किंवा त्यावर कायद्याची हरकत घेईल, किंवा त्या"मुद्याविषयीं नास्तिपक्ष स्वीकारून आपणावर निवाडा घेईल, तर त्याणे त्या जबाबाचा संबंधाने, अथवा त्या कज्जाचा जूरी समूरचा चौकशीमध्येही ते दृढकथन निश्चित कबूल केले आहे असे होते.”

 १५६. जा गैरलागू घडलेल्या गोष्टी कज्जांतील जाबजबाबांत लिहावयास नकोत, त्यांस पूर्वोक्त कबूलपणा लागत नाही; आणि दुसऱ्या एकाद्या गोष्टीवर