पान:प्रमाणशास्त्र.pdf/८०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


पक्षकारा चा स्वहिताविरुद्ध कबूलपणा.

७१

"भावोली ( म्हणजे जमीनदार आणि कसणार हे" काही नियमांनी पिकाचे वाटप करून घेतात, असा एक जमिनीचा सत्तापकार आहे, या ) नियमाने" लागवडीस जमीन घेतली असून, तिजवरील सर्व पीक कसणारांनी कापून नेले, म्हणान त्यांजवर" फिर्याद आणली; तीत, वादीने आपणास योग्य वेळी बी पुरविले नाही, आणि जे त्याणे दिलें तें जुने आणि वाईट होते, असा कसणार कुळांनी जबाब "दिला; यावरून भावोली सत्ताप्रकाराविषयी त्यांचा" स्पष्ट कबूलपणा झाला असे ठरविले आहे."

 १५४. कोणताही जाबजबाब, जो विरुद्ध पक्षकाराने आपल्या जाबजबाबांत दाखल केलेल्या कांहीं घडलेल्या गोष्टींचा निन्हव करतो, त्यास, आडवें येणारा जबाब, असे म्हणतात; आणि जा गोष्टीचा असा आडवा जबाब देऊ शकवेल, तिला, आडवे येण्याजोगी हकीकत, असे म्हणतात. यास्तव शुद्ध कायद्याचा बाबतीवर आडवेपणा घेता येणार नाही तथापि कायद्याचा आणि घडलेल्या गोष्टीचा मिश्रित दृढकथनावर आडवेपणा घेता येईल.आणखी विरुद्ध पक्षकाराने आपल्या जाबजबाबांत जा गोष्टीचें दृढकथन केलें नाहीं,किंवा जी हकीकत आवश्यकतेने त्यांत गर्भित नाही,तिजवर त्यास आडवेपणा घेता येत नाही. याचप्रमाणे एकाद्यास अमुक गोष्टीवरून प्रतिबंध होऊन आडवें येण्याची मनाई होईल. जसे, जा जमिनीचा किंवा घराचा मालकास भाडोत्री भाडे देतो त्याचा