पान:प्रमाणशास्त्र.pdf/७९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


७०
कर्णोपकर्णी पुराबा.


 १५१.एकाया मुकदम्यांतील एकाद्या पक्षकाराने, किंवा त्याचा भागीदाराने, किंवा त्याचा अखत्यान्याने,किंवा जाचा संबंधाने तो वाद सांगत असेल याणे,आपल्या हिताविरुद्ध केलेला कबूलपणा त्या पक्षकाराचाविरुद्ध पुराव्यांत ग्राह्य आहे. सदरहु कबूलपणा कंजांतील जाबजबाबांवरून दिसून येईल;अथवा दुसऱ्या प्रसंगी तोडी किंवा लेखी कबूलपणा केलेला असेल.

 १५२.कजांतील जाबजबाबांविषयी सविस्तर वर्णन करून या ग्रंथाची कप्त मर्यादा उलंघिल्याशिवाय,मुकदमा चालत असतां त्यांतील जाबजबाबांत केलेल्या कबूलपणाचा परिणाम पूर्णतेने स्पष्ट करून सांगता येणार नाही,तथापि हा कठीण विषय विलायतेत चालू आहे;या संबंधी तेथील कांहींप्रमुख नियमांचे उद्घाटन करूं.

 १५३."दुसऱ्या पक्षाकडील जाबजबाब वगैरेंत"सांगितलेल्या हकीकतीस आडवें येतां येईल अशी "सवड असून तिला आडवे आले नाही, तर ती आडवेंन येणारानें कबूल केली असा नियम आहे." म्हणजे, कज्जांतील प्रत्येक प्लीडिंगांत ( म्हणजे जाबजबाब वगैरेमध्ये) सामनेवाल्याने जी सर्व दृढकथने केली असतील, ती आपल्या जाबजबाबांत वगैरे जरनाकबूल केली नसतील, तर ती कबूल केली आहेत, असें गृहीत आहे; परंतु ती सामनेवाल्याची दृढकथनें अशी असली पाहिजेत की, जाबजबाबांचा स्थापित नियमाप्रमाणे ती नाकबूल करता आली असती.