पान:प्रमाणशास्त्र.pdf/७८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


पक्षका राचा स्वहिताविरुद्ध कबूलपणा.

६९

झाली तिची प्रत्यक्ष साक्ष अयोग्य रीतीने दाबून ठेविली असल्यास, तिणे नालस्ती केल्याबद्दलची साक्षकबूल केली जाणार नाही, असें ही आणखी दिसते;कारण, अशा साक्षीचा जोर प्रत्यंतरी पुराव्यादाखल आहे.

 १५०. खाली लिहिलेल्या बाबतींत पुढे सांगितलेल्या शरतीबरहुकूम कर्णोपकर्णी पुरावा कबूल करण्यांत येतो.

 १ एकाद्या मुकदम्यांतील एकाद्या पक्षकाराचा स्वहिताविरुद्ध कबूलपणा.
 २ अंगीकार ( म्हणजे, गुन्हा कबूल करणे ).
 ३ सार्वजनीन किंवा सर्वसाधारण हिताची प्रकरणे.
 ४ वंशावळी, किंवा एकरक्तसंबंध, किंवा आत्मपणा.
 ५ प्राचीन भोगवटा.
 ६ पक्षकारांशिवाय अन्य मनुष्यांहीं स्वहिताविरुद्ध बोललेली साङ्केतिक बोलणी, किंवा लिहिलेला मजकूर.
 ७ कामाचा ओघांत किंवा क्रमांत झालेली साङ्केतिक बोलणी किंवा लिहिलेलामजकूर..
 ८ अंतकाळची साङ्केतिक बोलणी.
 ९ वैद्यांचा जबान्या आणि रसायन विद्येसंबंधी परीक्षकांचे रिपोर्ट,