पान:प्रमाणशास्त्र.pdf/७७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
६८ 

कर्णोपकर्णी पुरावा.
ठिकाणीही घेतली जात्ये; आणि पूर्वोक्त हकीकती, वैद्याने रोग्यास प्रश्न विचारल्यावरून उत्तरद्वारा सांगितल्या असल्यास, त्या विशेष मान्य होतात. कारण,रोगलक्षणाची परीक्षा करण्यास योग्य अशा पुरुषाने प्रतिप्रश्न करून त्या हकीकती काढलेल्या असतात.

 १४८.आणि याच नियमावरून, कोणी मनुष्यावरून गाडी जाऊन तो मरण पावला असल्यास,त्याजला दुखापत झाल्यावर तन्क्षणीं में तो बोलला असेल, ते त्या गाडी हाकणारावरील मनुष्यवधाचा चौकशीचा पुराव्यांत घेतले जाईल.

 १४९. परंतु वैद्याजवळ किंवा दुसऱ्या मनुष्याजवळ सांगितलेलें गान्हाणे, जा. एकाद्या गोष्टीनें क्लेशमाप्त झाला असे म्हणणे असेल, त्या गोष्टीविषयी किंवा त्या क्लेशाचे कारण अमुक मनुष्य आहे, असा आरोप ठेवण्याविषयीं, पुरावा होणार नाही असे दिसते; परंतु स्वतांविषयी मात्र पुरावा होईल. आणि या कारणास्तव बलात्काराने स्त्रीसंभोग केल्याचा खटल्यांत फिर्यादीचा तर्फेचा वकीलास, जा स्त्रीस दुखापत झाली तिणे त्या बलात्काराविषयी काही गा-हाणे केलें, किवा नाही,असे साक्षीदारास विचारण्याची मोकळीक आहे. कारण तिणे गा-हाणे केले होते किंवा नाही, हे जाणणे मोठे आवश्यक आहे; परंतु तिणे कोणाविरुद्ध नालस्ती केली त्याचे नाव किंवा त्या नालस्तीतील कांही विवक्षित हकीकती विचारण्यास त्याजला परवानगी नाही. अशा हकीकतीविषयी त्या स्त्रीने स्वतः शपथेवर जबानी दिली पाहिजे. जा स्त्रीस दुखापत