पान:प्रमाणशास्त्र.pdf/७६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


कर्णोपकर्णी पुरावा.

६७

त्या मनष्याने ती चिठी करून देत्ये वेळी चिठी करून देणाराचा नावे लिहिलेली पत्रे, त्या चिट्ठीचाऐवजाचा शाबितीकरितां पुराव्यांत घेतली जातात.

 १४६.वर सांगितल्या प्रमाणे साङ्केतिक बोलण्यासहित केलेले कृत्य त्या चौकशीस लागू असलेपाहिजे,हे आवश्यकच आहे; आणि जी साङ्केतिक बोलणी ग्राह्य आहेत, असे आपण वर उपपादन करीत आलों ती साङ्केतिक बोलणी जा गोष्टीविषयी चौकशी असत्ये तिचे अंश असतात, सबब, किंवा तेणेंकरून तिचा खुलासा होतो सबब ती ग्राह्य होतात;आणि या शेवटील सबबेवरून ती ग्राह्य असल्यास योजनेवांचून किंवा संकल्पावांचून ठिकाणचा ठिकाणी स्वाभाविक प्रस्पुष्ट झाली पाहिजेत; तर त्यांचे वजन आहे असे दिसते. कारण,ते कृत्य घडल्या नंतर भरत्या साङ्केतिक बोलणाराची साक्षीदाखल अबानी घेतली, तर तो जी हकीकत सांगेल त्यापेक्षा पूर्वोक्त माङकेतिक बोलणे हे त्या कृत्याचा स्वरूपाविषयी अधिक चांगला पुरावा होईल, असे स्टार्कीने लिहिले आहे.

 १४७ तसेच, एकाद्या मनुष्यास मारामारीपासून दखापत झाली असल्यास, आपल्या वेदना व क्लेशयांविषयी आपल्या वैद्याजवळ त्याणे सांगितलेल्या हकीकती, त्या मनुष्याची त्या वेळची वास्तविक स्थितिशाबीत करण्यास, पुराव्यांत घेतल्या जातात. जेव्हां रोग्याची विवक्षित काळची शरीरप्रकृतीची खरोखर स्थिति मुद्यास लागू असत्ये, तेव्हां अशी साक्ष इतर