पान:प्रमाणशास्त्र.pdf/७५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


६६
कर्णोपकर्णी पुरावा.

नाकबूल करण्यात येईल. कारण, ती पूर्वसङ्केताचा बेतास अनुसरून आणि मसलतदारांचा साधारण हेतूने सांगितलेली किंवा लिहिलेली नसेल, आणि यास्तव ती, सर्व मसलतदारांचें साङ्केतिक बोलणे आहे, असे मानले जाणार नाही.

 १४४.आणखी,"एकाद्या विवक्षित कृत्याचा "स्वरूपाविषयीं, किंवा जाणे ते कृत्य केले त्या मनुष्याच्या इराद्याविषयी चौकशी करणे अवश्य असल्यास, ते करन्ये वेळी तो मनुष्य काय बोलला त्याची शाबिती त्या कृत्याचे खरे स्वरूप दाखविण्याकरितां पुराव्यांत ग्राद्य होईल.
  उदाहरण, एकादा मनुष्य आपलें घर सोडून कोणत्या इराद्याने निघून गेला, हे दाखविणे अवश्य असल्यास, घर सोडून जात्ये वेळी तो जे शब्द बोलला असेल, ते त्याचा इरादा दाखविण्याकरितां साक्षीत कबूल केले जातील; परंतु इतर कारणाकरितां कबूल केले जाणार नाहीत. तसेच, आपल्या वाईट वागणुकीने आपल्या बायकोस घर सोडून जाणे नवऱ्यानें जरूर केलें, याविषयी शाबिती करण्यास्तव बायको घरांतून निघून जात्ये वेळी जे बोलली, ने त्या गोष्टीविषयी नवऱ्याविरुद्ध शाबिती करण्यास्तव "पुराव्यांत कबूल करण्यास योग्य आहे, असें ठरवि.ले आहे."

 १४५. अशाच कारणास्तव, एकाद्या प्रामिसरी नोटीचा ऐवज जास द्यावयाचा म्हणून करून दिली असेल, किंवा जाचा नावें तिजवर शेरा मारला असेल,