पान:प्रमाणशास्त्र.pdf/७४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


कर्णोपकर्णी पुरावा.

६५

 १४२. कर्णोपकर्णी पुराव्यापासून भिन्न असा जो पूर्वोक्त प्रकार फिलिफ्स् याणे लिहिला आहे तो असा की, जे बोललेले शब्द साक्षीदार कोडतास सांगतो, ते स्वतः जा व्यवहाराविषयी चौकशी चालली असत्ये त्याचे अंश असतात, किंवा त्याचे स्वरूप दाखविण्याजोगे त्या व्यवहाराशी निकट संबद्ध असतात.
 १४३. उदाहरण, तोंडचा किंवा लेखी हुकमाचा बाबीत किंवा अब्रू घेण्याजोग्या मजकूराचा बाबदीत, किंवा शिव्यागाळीचा भाषणाचा बाबदीत,किंवा या प्रकारचा दुस-या बावदींत, बोललेले शब्द किंवा लेख, यांजविषयी चौकशी चाललेली असलयास अशा शब्दांविषयींची साक्ष ही सहजच प्रधान पुराव्याचा स्वरूपाची असून कर्णोपकर्णीपासून केवळ भिन्न आहे. आणि त्याच प्रमाणे, पूर्वी सांगितल्या अन्वयें संगनमताचा खटल्यांत मूळचा संकल्पास अनुसरून असणारी आणि साधारण हेतूचे अनुसरण करणारी इतर मसलतदारांची साङ्केतिक बोलणी ही, त्या मसलतदारांचा सर्व टोळीची साङ्केतिक बोलणी आहेत, असे मानले जाते; सबब अशा बाबतीत अशा साङ्केतिक बोलण्यांविषयी साक्ष प्रधान स्वरूपाची असत्ये. कारण, त्या शब्दांविषयींच चौकशी चालली असत्ये म्हणून तो पुरावा मधान होय. आतां उलट . पाहतां, त्या मसलतीचा संबंधाचा व्यवहाराविषयी त्या मसलतदारांपैकी एकाद्याने मागाहून सांगितलेली, किंवा लिहिलेली केवळ बातमी किंवा हकीकत, ही कर्णोपकर्णी पुरावा समजून