पान:प्रमाणशास्त्र.pdf/७२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


कर्णोपकर्णी पुराया.

६३

"अशी साक्ष पूर्वीचा चौकशीत न्यायसंबंधी रीतीखेरीज दिलेली नसून,शपथेवर दिलेली होती; दाव्यांतील पक्षकार तेच होते;मुद्याची गोष्ट तीच होती;आणि"त्या वेळेस प्रतिप्रश्न करण्यास सवड दिलेली होती. या हकीकतीवरून पूर्वोक्त साक्ष कर्णोपकर्णी पुराव्याहून स्पष्ट निराळी आहे

 १३८.याचप्रमाणे,आरोपित मनुष्याचा समक्ष माजिस्लेटाने साक्षीदाराची जबानी घेऊन तिजवर आपल्या सहीनिशींचा खरेपणाविषयीं शेरा लिहिला असेल,तर,तो साक्षीदार चौकशी पूर्वी मैयत झाला

असल्यास,किंवा कोणत्याही कारणामुळे हजर करनां येत नाही,अशी कोडताची खातरी झाल्यास त्याची जबानी पुराव्यांत घेतली जाईल, (सन १८६१ चा आक्ट २५ कलम ३६९).

 १३९. त्याचप्रमाणे, सन १८५९ चा ८ व्या आक्टाचा १७५ कलमा अन्वयें कमिशन् पाठवून घेतलेली गैरहजर साक्षीची जबानी, कलम १७९ अन्वये जा पक्षकाराचा विरुद्ध दाखल व्हावयाची आहे, तो पक्षकार कबूल असल्यास, किंवा "तो साक्षीदार "कोटींचा अधिकाराचा हद्दीबाहेर आहे, अगर तो "मैयत झाला आहे, अगर दुखण्यामुळे अथवा अशक्तीमुळे साक्षी देण्याकरितां त्याला खुद जातीने हजर होववत नाहीं; अगर कोणाचा संगनमतावांचून "कोर्यचा कचेरीचा ठिकाणापासून शंभर मैलांहून"अधिक अंतरावर तो आहे, अगर मोठ्या पदवीचा "मनुष्य म्हणून किंवा बायकोमाणूस म्हणून खुद