पान:प्रमाणशास्त्र.pdf/७१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


६२
कर्णोपकर्णी पुरावा,

लबाडी केली असेल; आणि कदाचित् उघड कोडतांत त्याजला शपथ देऊन त्याची जबानी घेतली असती तर त्याणे निराळाच मजकूर सांगितला असता, किंवा त्याची लबाडी प्रतिप्रश्नाचा योगेंकरून उघडकीस आली असती.

 १३६. आता, 'कर्णोपकर्णी' हा शब्द में कांही ऐकिलें असेल त्यास मात्र लागू होईल असे दिसते,तथापि जे साधारण लेख खुद जबाबदारीने केलेले नसतात, त्यांस ही तो त्याच प्रमाणे लागू होतो. याच प्रमाणे, तिसऱ्या मनुष्याने लिहिलेले पत्र त्यांत लिहिलेल्या हकीकतींचा खरेपणाचा पुराव्यास आणल्यास तें अग्राह्य आहे. कारण, ते पत्र लिहिणारास त्यांतील गोष्टींचा खरेपणाविषयी शपथ दिलेली नव्हती, किंवा व्याजला प्रतिप्रश्न केलेले नव्हते.

 १३७. कर्णोपकर्णी पुराव्यापासून भिन्न असे पुराव्याचे दोन प्रकार आहेत, त्यांतील साक्षींस कर्णोपकर्णी साक्षी असें यथार्थ म्हणतां येत नाही, असे फिलिफ्स् याणे लिहिले आहे.

 (१) कोणी पक्षकारांचा दरम्यान एका मुद्यावरून"तंटा असून त्याचा चौकशीत कोणी साक्षीदाराची "शपथेवर जबानी होऊन तो मैयत असेल आणि त्याच "पक्षकारांचा दरम्यान दुसऱ्या कन्जांमध्ये त्याच मुद्याची भानगड असेल, तर ती मैयताची जबानी दुसन्या "दाव्याचा चौकशीत ग्राह्य आहे; आणि जा एकाद्या मनुष्याने त्याजला साक्ष देतानां ऐकिलें, त्या मनुष्याचा साक्षीने तिजविषयी शाबिती करता येईल. कारण,