पान:प्रमाणशास्त्र.pdf/७०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


कर्णोपकर्णी पुरावा.

६१

 १३३. जा नियमा अन्वये उत्कृष्ट प्रतीचा पुरावा आणिला पाहिजे त्या नियमाने कर्णोपकर्णी आणि गौण पुरावा वर्ज होतो; हे त्या नियमापासून अतिसाधारण कार्य होते. हे दोन प्रतीचे परावे वर्ज करण्याचे कारण असे की, त्यांची मजबुदी कांहीं दुसऱ्या प्रधान पुराव्यावर असून तो प्रधान पुरावा हजर केलेला नसतो.

 १३४. एकाद्या साक्षीदारास जाविषयी स्वताच्या ज्ञानाने माहिती नाही, परंतु जे त्याणे दुसरा एकादा मनुष्य बोलतानां ऐकिलें आहे ते तो सांगत असल्यास अशा साक्षीदाराने दिलेल्या साक्षीस 'कर्णोपकर्णी पुरावा' असे म्हणतात; आणि हा पुरावा दोन कारणांवरून बहुधा नाकबूल केला जातो. ती ही की,(१) जा मनुष्याचे जे बोलणें तो साक्षी पुनरुक्त करतो, तो मनुष्य कोर्टासमूर शपथेवर किंवा प्रतिज्ञेवर नव्हता; (२) किंवा त्यास कोडतांत प्रतिप्रश्न करण्यास सवड नव्हती.

 १३५. त्याच प्रमाणे, मुद्याचा गोष्टीविषयी बहा कांहीं मजकूर बोलला, तो, साक्षीदार अ याणे ऐकिला, तो मजकूर कोडतास सांगण्याची त्याजला( म्हणजे अला) परवानगी नाही. कारण, न्यायसंबंधी शपथेचा आधारावांचून आणि त्याजला मतिप्रश्न झाल्यावांचून बनें तो मजकूर सांगितलेला होता;कदाचित् बने तो मजकूर थट्टेने किंवा पुरता विचार केल्यावांचून बोललेला असेल, किंवा त्याणे बुद्धिपूर्वक