पान:प्रमाणशास्त्र.pdf/६९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


६०
उत्कृष्ट पुरावा हजर करणे.

तीएक चाक्षुष साक्षी असून त्यांपैकी एकाद्या पक्षकारास त्याचा मर्जी प्रमाणे पाहिजे असतील ते आणतांयेतील,आणि कोणी असे साक्षीदार आणले असतां,त्यांहून अधिक भरवशाचे साक्षीदार आणतां आलेअसते, अशी सबब ठेवून त्यांची साक्ष घेणे कोडत नाकबूल करणार नाही. जास्त भरवशाचा साक्षीदार याजला पक्षकाराने आणिला नाही म्हणून हजर केलेल्या पुराव्यावरील भरवसा बाधित होऊ, परंतु त्याचा ग्राह्यतेस बाध येणार नाही.

 १३०.आणि याच प्रमाणे एकादा दस्तऐवज हरविल्याची शाबिती झाल्यावर,त्यांतील मजकूरज्याचा नकलेवरून किंवा जांणीं तो वाचिला असेल त्यांचा तोंडचा साक्षीवरून शाबीत करता येईल,असे जरी आहे,तरी या दोहों रस्त्यांपैकी,नकलेवरून शाबीत करणे, हे बहुतकरून अधिक खातरीलायकहोईल,

 १३१.परंतु एकाद्या व्यवहारासमयीं एकादा मनुष्य हजर असून त्याचा त्यांत हात असेल,आणि त्या व्यवहाराची शाबिती त्याचा साक्षीवरून करता येत असतां मुद्याबाहेरील गोष्टीवरून त्या व्यवहाराविषयीं अनुमान काढणे, हे शास्त्रा प्रमाणे बस नाही..

 १३२. बेस्ट याणे या नियमाचा एक अर्थ असा सांगितला आहे की,“जा पराव्याची बळकटी दुसऱ्या एकाद्या दाबून ठेवलेल्या पुराव्यापासून प्राप्त होते, असे जो पुरावा पाहतांच दिसून येते तो "पुरावा घेतला जाणार नाही."