पान:प्रमाणशास्त्र.pdf/६८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


उत्कृष्ट पुरावा हजर करणे.

५९

चार करूं.आतां, हा विचार कर त्ये वेळी अग्राह्य पुरावा कोणता आणि अविश्वसनीय कोणता,यांतील भेद स्पष्ट करून दाखवणे, हे फार अगत्याचे आहे.हिंदुस्थानांतील देशीय लोक,अमुक पुरावा अग्राह्य आहे,असे साधारणतः म्हणतात; परंतु तो अविश्वसनीय किंवा अमासंगिक आहे असा त्यांचा भाव असतो. जरी हा भेद इंग्रेजी कायदा जाणणारांस उघड आहे, तरी हा एथें सांगितला आहे त्याविषयीतशा वाचणारांनी क्षमा करावी.

 १२६.जो पुरावा कायदा घेणार नाही, म्हणजे जो दाखल करण्याची कायदा मनाई करील,त्यास, 'अग्राह्यः पुरावा म्हणतात;आणि असा पुरावा जर नजरचुकीने घेण्यांत आला असेल, तर तो दफतरावरून दूर केला जाऊन निरर्थक समजला जाईल.

 १२७. आतां उलट पाहतां, पुरावा पूर्णतेने ग्राह्य असून तो अविश्वसनीय असू शकेल; आणि अशा ठिकाणी जरी तो भरवशास किंवा मान्यतेस नालायक असेल, तथापि तो ऐकून घेण्यास कोडत नाकबूल करणार नाही.

 १२८. पुराव्याचा ग्राह्यतेविषयी असा नियम आहे की, कज्जाचा स्वरूपावरून जो अत्युत्कृष्ट पुरावा असेल तो दाखल पाहिजे.

 १२९. या नियमांत, उत्कृष्ट पुरावा, म्हणून जे शब्द आहेत, त्यांचा अर्थ, फार खातरजमा करून देण्या जोगा किंवा फार भरवसा ठेविण्या जोगा, असा होत नाहीं; कारण एकाद्या घडलेल्या गोष्टीविषयीं कि-