पान:प्रमाणशास्त्र.pdf/६७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


५८
उत्कष्ट पुरावा हजर करणे.

असून एकमेकांपासून स्वतंत्र असल्यास, त्यांवरून मुख्य गोष्टीवर भरवसा ठेवण्यास किंवा गैरभरवसाकरण्यास तितकी निराळी व स्पष्ट कारणे होतील.दुसरें, इनसाफाचा कोडतांत खोट्या साक्षीने एकच मुख्य गोष्ट शाबीत करण्याचा अडचणीपेक्षां, खोट्यासाक्षीने अनेक अप्रधान गोष्टी शाबीत करण्याचीअडचण अतिशय मोठी असली पाहिजे; आणि चौकशी समयीं जा गोष्टी अकस्मात् निष्पन्न होतात त्यांविषयी अनेक साक्षींचा एकसारखा मजकूर असला पाहिजे, अशा जेव्हां अनेक अप्रधान गोष्टी एकमेकांशी गुंतलेल्या किंवा जुळलेल्या असतात, तेव्हां त्या साक्षीचा खरेपणा किंवा खोटेपणा साधारणतः बाहेर पडतो.

 १२४.प्रत्यक्ष पुरावा आणि आगंतुक पुरावायांचा जाति इतक्या भिन्न आहेत की, त्यांची प्रत्यक्षतुलना बहुधा करितां येत नाही.हिंदुस्थानांत मुख्य गोष्टीविषयीं जो साधारणतः तोंडचा पुरावाआढळतो, त्यापेक्षा कितीएक कजांतून आगंतुक पुरावा फार खात्री लायक असतो,असा सिद्धान्त आपणासनिर्भयरीतीने काढतां येतो.उत्कृष्ट पुरावा हजर केला पाहिजे.

 १२५. मुद्याबाहेरील गोष्टीविषयी पुरावा कायद्यावरून नाकबूल करण्यांत येतो, हे पूर्वी सांगण्यांत आले आहे. आतां, जा नियमाने कमी प्रतीचा पुरावा नाकबूल करण्यांत येतो त्याविषयी आपण वि-