पान:प्रमाणशास्त्र.pdf/६६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


आगंतुक पुरावा.

५७

 १२२. अन्यक्ष पुराव्यापेक्षां आगंतुक पुरावा कमी किमतीचा आहे, असे कायदा मानीत नाही, व जेथे प्रत्यक्ष पुरावा देतां येतो, तेथे आगंतुक पुरावा मुळीच मकून देत नाही. तरी प्रत्यक्ष पुरावा दाबून ठेवणे,हे साधारणतः संशय उत्पन्न करिते, आणि यास्तव एका मुद्याविषयी प्रत्यक्ष पुरावा मिळत असतांत्याच मुद्याविषयीं फकत आगंतुक पुराव्यावर भरवसा न ठेवण्याची वहिवाट साधारणतः आहे. इंग्लंडांतील लोकांत सत्याला मोग मान आहे, आणि असत्य अतिशय लाजिरवाणे मानले जाते; म्हणून, तेथें, नजरेनेपाहिलेला मजकूर सांगणाऱ्या साक्षीदाराची प्रत्यक्ष साक्ष, ही आगंतुक पुराव्यापेक्षा विशेष निर्भय आहे,असें साधारणतः ते मानतात. परंतु जा देशांत खोटी मतिज्ञा आणि असत्य भाषण यांची विशेष खातरी बाळगीत नाहीत, तेथे प्रत्यक्ष पुराव्याचे सापेक्ष वजन फारच कमी असते.

 १२३. आगंतुक पुराव्याचा बाबीत चुकी होज्याविषयी दर्शनी उघड दुहेरी संभव आहे, हे खरे आहे: कारण साक्षीदार कोडताला फसवितील इतकेंचनाही. परंतु त्यांणी सांगितलेल्या हकीकतींवरून अ. नमान काढितानां कोडताची चुकी होऊ शकेल; पण पक्षान्तरी, ही शेवटील चुकी होण्याचा संभव प्रत्यक्ष पराव्याचा बाबतीत नसतो. आतां उलट पाहतां, शाबीत झालेल्या हकीकतीवरून उत्पन्न होणारे अनुमान इतके मजबद होऊ शकेल की, त्यांत चकी होण्याचा संभव फार थोडा असेल; कारण त्या हकीकती पुष्कळ