पान:प्रमाणशास्त्र.pdf/६५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


५६
आगंतुक पुरावा.

असतात परंतु अशा हकीकती पुष्कळ ठिकाणी विशेष उपयोगी पडत नाहीत.आरोपित मनुष्याचावर्तणुकीविषयी गैरसमजूत झाली असेल; झालेली भीति त्याचा स्वभाविक भित्रेपणामुळे उत्पन्न झालीअसेल; किंवा खाली लिहिलेल्या कल्पनांवरून ती भीति योग्य रीतीने अपराध्याचा मनांत स्थापित झालीअसेल; म्हणजे, त्या कल्पना अशा की, त्या मुकदम्यांलल्या हकीकती आपणास प्रतिकूळ आहेत, व आपले शत्रु सबळ आहेत, किंवा आपली चौकशी आचारअष्ट किंवा नालायक न्यायाधीशापुढे होईल, या विचारांकडे दक्षिण हिंदुस्थानांत विशेष लक्ष दिले पाहिजे, कारण, तेथील लोक जात्या भित्रे असून अधिकान्यांवर त्यांचा बहुधा भरवसा नसतो. आतां उलट पाहतां, कैदी याजला इनसाफ टाळण्याचा सवडीअसून त्या त्याणे साधल्या नसल्यास,ही गोष्ट त्यास फार अनुकूळ समजली जाईल;आणि,असा मी हजर न झालों तर इतर रीतीने मला पकडतील,अशी त्याची खात्री नसतां तो आपोआप इनसाफ होण्याकरितां हजर झाल्यास,ती गोष्ट त्यास त्याहून अनुकूल होईल.

 १२१. शेवटचे सांगणे असे आहे की, आगंतुक पुरावा कैदीचा कबूलपणा विषयींचा असतो. असा पुरावा घेण्याची बाबत "कर्णोपकर्णी" पुराव्याचा सदरात अवश्य सांगितली पाहिजे; म्हणन कबूलपणा विषयींचा संपूर्ण विचार त्या जागी करणे फार सोईवार होईल, (या ग्रंथाचे कलम १६६ पहा)..