पान:प्रमाणशास्त्र.pdf/६४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


आगंतुक पुरावा.

५५


कल्पना करण्यास लोकांस वळविण्यासारख्या आफवा फैलावणे, ही साधारणतः अपराध करण्याविषयींचा तयारीत समाविष्ट होतात.ही शेवटी लिहिलेलो गोष्ट फार संशयोत्पादक आहे;कारण, हत्यारे विकत घेतली असल्यास ती स्वतांचा बचावाकरितां असतील विष घेतले असल्यास जीवजिवड्याचा नाश करण्याकरितां घेतले असेल; परंतु खोट्या अफवा फैलावण्याचं खात्रीलायक कारण क्वचितच सांगतां येईल.पूर्वी दिलेल्या धमकीविषयींचा पुरावा फार सावधगिरीने घेतला पाहिजे; कारण, त्या धमकीविषयी साक्षीदारांची गैरसमजूत झाली असेल, किंवा ते तिच्याविषयी गैररीतीने जाहीर करीत असतील इतकेच नाही, परंतु तो आमलात आणण्याविषयी मुळीच वास्तविक इरादा नसतां बोलण्यांत आली असेल. या प्रमाणे एका मनुष्याने उघड रीतीने धमकी दिलेली चुपी ऐकून, त्या धमकीचा योगेंकरून, जाणे धमकी दिली ततिच्यावर वहोम पडेल, असा भरवसा ठेवून, जा मनुष्यास धमकी दिली होती त्याचा तिसऱ्याच मनुष्याने खून केला;असे एक उदाहरण बेस्ट याणे लिहिले आहे.

 १२०.आगंतुक पुरावा केव्हां केव्हां गुन्ह्यानंतरचा कैदीचा वर्तणुकीविषयी असतो. जा वेळी त्याजला प्रथम धरिलें त्यावेळी त्याची वर्तणक, किंवाइनसाफाचा भीतीने पळून जाणे, किंवा निसटून जाण्याचा, किंवा आपल्या पाहारेकन्यास लांच देण्याचा प्रयत्न करणे, किंवा तो एकाएकी मातबर झाला, याहकीकती त्याचा अपराधाचा पुराव्यास वारंवार देत