पान:प्रमाणशास्त्र.pdf/६३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


५४
आगंतुक पुरावा.

माल सांपडला असेल तोच चोर आहे, असे अति संभाव्य होते.

 ११७. आगंतुक पुरावा बहुधा आरोपित मनुष्याचा पूर्वस्थितीचा किंवा वर्तणुकीचा संबंधाचा असतो. गुन्हा करण्याचे हेतु, आणि तो करण्याची साधनें व संधि, तो करण्याची तयारी, आणि तो करण्याविषयी पूर्वीचे यत्न, आणि तो करण्याचा इरादा बोलून दाखविणे, आणि तो करीन अशी धमकी देणे ही सर्व या सदराखाली येतात.

 ११८. कैदीचे गुन्हा करण्याचे जे हेतु असतील ते त्याजलाच मात्र माहीत असतात, परंतु जर एकादा उघड हेतु नसेल तर ती गोष्टी त्याचा तरफेर्ने हमेशा सबल कारण होईल.आतां याचा उलट पाहतां,एकादा हेतु असणे,ही गोष्ट विशेष वजनदारीची नाही.कारण पुष्कळ लोकांस अपराध करण्याचेहेतु असूनत्यांपैकी फार थोड्यांचा हातून वस्तुतः अपराध होतात.बेस्ट याणे लिहिले आहे की,आपल्या आई बापांचा प्राण घेण्याविषयी प्रयोजक कारणे साधारणतः मुलांस असतात,तथापि कितीशी मुले आपल्या आई बापांचा प्राण घेतात !यास्तव हेतु असणे, हे संशयाविषयी स्वतंत्र कारण न होतां,गुन्हा कां घडला हे सांगण्याचा विशेष उपयोगी पडते.

 ११९. विष, किंवा हत्यारे, किंवा वेष खरीद घेणे, किंवा खोट्या किल्ल्या करणे, किंवा दुसन्यावर वहीम पडावा अशा, किंवा जा मनुष्याचा खुनाविषयी इरादा केला असेल तो मनुष्य आजारी आहे, अशी