पान:प्रमाणशास्त्र.pdf/६२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


आगंतुक पुरावा

५३

"सबब प्रथमदर्शनी नालायक आहे,म्हणून ती खोटी "आहे,असे दाखविल्यावांचून मजवर चोरीचा अपराध स्थापित होऊं नये." सदरील कजांत, कैदी निर्दोषी आहे, असा जूरीने ठराव केला.

 ११४.मिस्तर ईस्ट याणे असे लिहिले आहे की,जेव्हां,एकाद्या अप्रसिद्ध मनुष्यापासून मी माल घेतला,अशी कैदीची तकरार असेल,आणि त्या मनुष्याविषयी कजांत पुरावा केला नसेल,तर अशाठिकाणी तो माल कैदीचा कबजांत प्रथम आल्याविषयी अनमान झाले असेल त्या वेळापासून कैदीचा वर्तकीचा त्याचा तकरारीशी कसा मेळ मिळतो,हीगोष्ट विचार करण्याजोगी बरीच जड आहे.

 ११५.(२)कबजा अनन्ययाही असला पाहिजे.म्हणजे जा जागी कैदी याचा मात्र एकट्याचा प्रवेश असेल त्या जागी तो माल सांपडलेला असला पाहिजे; नाही तर संशय घेण्यास आणखी काहों कारण असल्यावांचून त्याचा जाब मागतां येणार नाही.पुष्कळ कज्जांत चोरीचा माल घराचा अमुक भागांत सापडला,असे जाहीर केलेले असते;परंतु त्या घराचा भागांत दुसऱ्या कोणा मनुष्याने तो माल ठेववेलअसा संभव असतो,तेव्हां अशा पुष्कळ कज्जांचा पडशा करण्यांत या नियमाकडे सक्त लक्ष पोंच.विल्याने उपयोग होईल.

 ११६.किती एक कज्जांत विशेष हकीकती असतात, तेणेकरून जा मनुष्याचा कबजात चोरीचा