पान:प्रमाणशास्त्र.pdf/६१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


५२
आगंतुक पुरावा.

दिलेल्या जाबास वरील नियम लागू केले पाहिजेत.कोहर्स्ट याचा कजांत, एक लांकडाचा तुकडा नाहीसा झाल्या दिवसापासून पांच दिवसांनी कैदीचा दुकानांत आढळला, यावरून तो त्याणे चोरिल्याचा त्याजवर आरोप आणिला होता; त्या वेळी, तो तुकडा न्याशया नावाचा मनुष्यापासून मी विकत घेतला, असे कैदीने सांगितले; तो मनुष्य दोन मैलांचा अंतरावर राहत होता. कोणत्याही पक्षाकडून न्याश् याजला साक्षीत आणिलें नाही. पुढे त्या कज्जाची एकंदर हकीकत जूरीला सांगण्याचा वेळी ब्यारन् आल्डर- सन याणे खाली लिहिलेली समजूत दिली. ती अशीकी,-"अशा स्वरूपाचा कज्जांत हा साधारण नियम "तुम्हास ध्यानात ठेविला पाहिजे की, एकाद्या मनुष्याच्या कबजांत चोरीस गेलेला माल सांपडला असून, तो माल आपणास कसा मिळाला, याविषयी"जर तो मनुष्य लायक कारण सांगत आहे, जसें, "त्याणे जा मनुष्यापासून तो माल घेतला त्याचे नांव"सांगत आहे,आणि तो देणारा मनुष्य मूर्तिमंत आहे, "तर ते कारण खोटे आहे, असे दाखविण्याचा बोजा"खटला चालविणारावर आहे. परंतु कैदीने सांगि- "तलेले कारण प्रथमदर्शनी नालायक किंवा असंभाव्य"असल्यास, त्याचा सत्यपणा शाबीत करण्याचा बोजा 'त्याजवरच पडतो. उदाहरणा. एक घड्याळ चोरल्याबदल एका मनुष्याने जर मजवर आरोप आणिला, आणि अमुक व्यापाऱ्याचे नांव सांगून त्या."जवळून ते मी विकत घेतलें, असें मी म्हटले, तर ती